कृष्णा कारखान्यात १९८ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात आयोजित मोफत सर्वरोग आयुर्वेद निदान व आरोग्य तपासणी शिबीराला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. शिबीरात १९८ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. कारखान्याचे चेअरमन डॉ सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर किल्ले मच्छिंद्रगड यांच्या सहकार्यातून या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात डॉक्टरांनी जीवन शैलीमध्ये होणारा बदल या विषयी सविस्तर विवेचन केले. तसेच आयुर्वेदाचे महत्व स्पष्ट करत दैनंदिन आहाराविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या प्रकृतीप्रमाणे आहारातील विविध सूचना देत, प्रत्येकाला स्वतंत्र मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, सेक्रेटरी सिद्धेश्वर शिलवंत, जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, पर्यावरण अधिकारी सुयोग खानविलकर, गोडावून किपर किशोर देशमुख, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, स्टोअर किपर गोविंद मोहिते, अजित पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबीरास कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल निकम, डॉ. स्वाती शिंदे, डॉ. मेघा शिंदे, डॉ. अमृता डुबल, डॉ. अदिती मस्कर, डॉ. धनश्री पोळ, डॉ. तेजस्वी मुळे, जनसंपर्क अधिकारी विराज कुलकर्णी यांच्यासह वैद्यकीय स्टाफ यांचे सहकार्य लाभले.



