आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हा

विद्यार्थ्यांनी शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता कराड अबर्न बँकेच्या सहाय्याने उद्योजक बना – प्रा.विशाल गरड

 

कराड / प्रतिनिधी : –

युवकांनी लोकांच्या डोक्यात राहिल पाहिजे कारण डोक्यात गेलेली गोष्ट तःह्यात विसरत नाही. डोक्यात राहण्यासाठी काम करण्याची ताकत ही सकारात्मक विचारानेच येत असते आणि यासाठी चांगल्या वाचनाची गरज असल्याचे मार्गदर्शन प्रसिद्ध युवा व्याख्याते, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते व चित्रकार प्रा.विशाल गरड यांनी कै. वा. ग. तथा आण्णासाहेब चिरमुले ट्रस्ट सातारा व दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि., कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उद्योजकता विकास शिबिरासाठी उपस्थित कॉलेज युवक-युवतींना केले.
दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि., कराडच्या 107 व्या वर्धापनदिनानिमित्त बँकेच्या शताब्दी सभागृहामध्ये आयोजित केलेल्या 12 व्या उद्योजकता विकास शिबिराप्रसंगी प्रमुख वक्ते प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते व चित्रकार प्रा.विशाल गरड यांनी विद्यार्थ्यांना ‌‘युवकांना यशस्वी जीवनासाठी उद्योजकतेची गुरूकिल्ली‌’ या विषयावर मार्गदर्शन केले. कराड अर्बन बँक ही अशी एकमेव बँक आहे जी विद्यार्थ्यांना योग्य वयात उद्योजक बनविण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रमातून बाळकडू देत आहे. अर्थकारणाबरोबर अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने बँक राबवित असते; यामुळेच कराड अर्बन बँक सहकारी वित्तीय क्षेत्रामध्ये घट्ट पाय रोवून स्थिरावलेली आहे. उपस्थित सर्व विद्याथ हे कराड व परिसरातील आहात यामुळे आपण सर्वांनी आतापासूनच कराड अर्बन बँकेशी मैत्री केली पाहिजे कारण योग्य वयात योग्य मैत्री बनविली की भविष्य उज्वल बनते असे प्रा.विशाल गरड यांनी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.विशाल गरड म्हणाले, युवकांनी उद्येोजक होण्यासाठी लोकांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे परंतू त्या आगोदर स्वतःकडे असलेले सुप्तगुण ओळखणे आवश्यक आहे. शिक्षण ज्ञान देते परंतू मिळविलेल्या ज्ञानाचा वापर करून सामाजिक लाज सोडून जो युवक संयम ठेवून स्वतःचे अस्तित्व निर्माण करतो तोच यशस्वी उद्योजक बनतो. आजच्या स्पर्धेच्या युगात सर्व पातळ्यांवर यशस्वी होण्यासाठी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे.
आजचा युवक नव-नवीन तंत्रज्ञानामुळे अथवा सोशल मिडीयामुळे अनेक नवीन गोष्टी लगेच शिकत आहे. त्यांना समाजातील चांगल्या-वाईट सर्व गोष्टी लगेच समजत आहेत. परंतू, यामुळे अपयशातून, नैराश्येतून आत्महत्त्या करणे असे अनेक नकारात्कम विचार युवकांना सातत्याने येत असतात. ज्यांच्या डोक्यात नकारात्कम विचार येतात त्यांनी स्वतःच्या आई-वडीलांचा विचार करून ‌‘आईच्या दुधाची आणि बापाच्या घामाची उतरण केल्या शिवाय मरणाचा विचारही करणार नाही‌’ असा निश्चय करून नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक विचारासाठी चांगल्या वाचनाची सवय लावून घेण्याचे आवाहन ही प्रा.विशाल गरड यांनी यावेळी केले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव यांनी स्वागत, प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांची ओळख करून देत असताना, प्रा.विशाल गरड यांच्या शैक्षणीक तसेच विविध साहित्यीक कार्याची ओळख करून देत असताना वयाच्या अवघ्या 35 व्या वष प्रा.विशाल गरड यांनी मिळविलेले विविध क्षेत्रातील यशाची यशोगाथा वाचून दाखविली. आजच्या युवकांना मातृभाषेत व आपल्या भागातील यशस्वी माणसाने केलेले मार्गदर्शन अधिक उपयुक्त ठरेल हे ओळखूनच सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रभावी वक्ते, उत्तम मार्गदर्शक प्रा.विशाल गरड यांना बँकेने यंदाच्या उद्योजकता विकास शिबिरासाठी निमंत्रित केले आहे, असे सांगत सीए. दिलीप गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांनी कराड अर्बन बँकेत व्यवहार सुरू करून बँकेचा महत्वाचा कणा असलेल्ाा सभासद व्हावे, असे आवाहन देखील केले.
अर्बन बँक नेहमीच तरूण उद्योजकांना पतपुरवठा करून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहत आलेली आहे. प्रा.विशाल गरड यांच्या आजच्या मार्गदर्शनातून उपस्थित विद्याथ प्रोत्साहीत होवून नक्कीच नवीन व्यवसाय संधी शोधतील, असा विश्वास व्यक्त करून बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल लाहोटी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी प्रा.विशाल गरड यांचा बँकेच्यावतीने ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ.सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल लाहोटी व मुख्याधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अर्बन बझार व डॉ. द.शि. एरम अपंग सहाय्य संस्थेच्या उपाध्यक्षा जयश्री गुरव, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य, कराड परीसरातील सुमारे 1000 महाविद्यालयीन विध्याथ, प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी आयोजित चर्चासत्रात विद्याथ व प्राध्यापकांनी शंका विचारून सहभाग घेतला.

कराड अर्बन बँकेचा 107 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
दि.24 जानेवारी रोजी बॅंकेचा 107 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने कराड येथील मुख्यकार्यालय इमारतीमध्ये सकाळी 8.30 वा. सत्यनारायण पुजा संपन्न झाली. यानंतर बँकेच्या संचालिका सौ.रश्मी सुभाष एरम व महाव्यवस्थापक सलीम शेख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच कराड शहरातील श्रीराम दिनदर्शिकेचे कल्पेश पाटसकर व त्यांच्या सहकारी कलाकारांनी रेखाटलेल्या प्रभू श्रीराम यांची चित्रे श्रीराम जन्मभूमी न्यास, अयोध्या येथे लावण्यात आली आहेत. यानिमित्त कल्पेश पाटसकर व त्यांच्या सहकारी कलाकारांचा बँकेच्या वतीने ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी अध्यक्ष डॉ.सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

तळभाग शाखेद्वारे फ्रँकींग सेवेचा शुभारंभ
बॅंकेच्या 107 वा वर्धापनदिनानिमित्त तळभाग शाखेत फ्रँकींग सेवेचा शुभारंभ कराड क्र. 1 चे दुय्यम निबंधक अल्ताफ पटेल व कराड क्र. 2 चे दुय्यम निबंधक ज्ञानेश्वर देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी भाऊ, अध्यक्ष डॉ.सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, तसेच संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत फ्रँकींग सेवा ही फक्त कराड अर्बन बँकेद्वारेच दिली जात असून बँकेच्या पोवई नाका सातारा व तळभाग कराड या शाखांमध्येच सुरू आहे. सदर सेवेचा लाभ कराड शहर व परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपमहाव्यवस्थापक अतुल शिंदे यांनी केले.

 

Related Articles