आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

कामथी येथे 5:30 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ

कराड / प्रतिनिधी :-

कामथी ता. कराड येथे ग्रामपंचायत ते ज्योतिबा मंदिर रस्ता कॉंक्रिटीकरण आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक दोन मधून सुरली, कामथी,पाचुंद जिल्हा हद्द रस्ता यांचे भूमिपूजन सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ साहेब, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, कराड तालुका अध्यक्ष शंकरराव शेजवळ, माजी जि. प. सदस्य समृद्धी जाधव, युवा नेते कुलदीप शिरसागर,शिवराज पाटील यांची उपस्थिती होती.

जिल्हा हद्द रस्त्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष प्रयत्नातून पाच कोटी 38 लाख रुपये मंजूर झाले होते. त्याचबरोबर ग्रामपंचायत ते जोतिबा मंदिर या रस्त्यासाठी काँक्रिटीकरण करण्यासाठी सात लक्ष रुपये मंजूर झाले होते. या दोन्ही कामाचा शुभारंभ आज कामथी येथे करण्यात आला.

यावेळी कामथीचे सरपंच प्रकाश खंडागळे, उपसरपंच वैशाली मदने, किसान मोर्चा अध्यक्ष प्रशांत भोसले, किसान मोर्चा लोकसभा समन्वयक सूर्यकांत पडवळ, नवीन जगदाळे, बाळासो पोळ, सुभाष जाधव, जिल्हा सचिव दिपालीताई खोत,सरचिटणीस जितेंद्र मोरे, ग्रामपंचायत सदस्य पूजा साळुंखे, ,अनिल पोळ, जयसिंग डांगे, शरद चव्हाण, सोसायटीचे चेअरमन सुनील खंडागळे, व्हा. चेअरमन रामचंद्र चव्हाण, नामदेव खंडागळे यांच्यासह कामथीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार रामभाऊ खंडागळे यांनी मानले

Related Articles