सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्यावर महिला कर्मचारी आरोग्य तपासणी शिबिर 

कराड/प्रतिनिधी : –

रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर महिला कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. कृष्णा हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या शिबीरात ७७ महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

रेठरे बुद्रुकच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रियांका साळुंखे यांच्या हस्ते व कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालिका सौ. सुजाता जाधव आणि सौ. सुनीता शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या आरोग्य शिबीराचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी मॅनेंजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दीपक जाधव, छत्रपती संभाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. निशा पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी सौ. साळुंखे म्हणाल्या, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. निरोगी कर्मचारी हीच संस्थेची खरी ताकद असल्याची भूमिका कारखाना व्यवस्थापनाने कायम जपली असल्याने, नियमितपणे आरोग्य तपासणी शिबिरे, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि विविध आरोग्यविषयक उपक्रम याठिकाणी राबविले जातात.

शिबीराची सुरवात धन्वंतरी आणि सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. शिबीरात ‘आशा मोबाईल एक्स्प्रेस स्क्रिनिंग व्हॅन’च्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याची तपसणी करण्यात आली. कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती सिन्हा, डॉ. नेहा पडवळ, प्रा. उज्वला माने, प्रा. मंदाताई फुके, माधुरी गायकवाड, सुजाता भोसले, प्रिया कदम, ज्योत्स्ना चव्हाण, डॉ. अवंतिका, डॉ. धीरज माने, विशाल मोहिते, रईस पटेल, डॉ. महेंद्र आलाटे आदींसह कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल निकम यांच्यासह अन्य स्टाफचे या शिबीरास सहकार्य लाभले.

Related Articles