अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी देशव्यापी बंद – सागर पाटील
कराड/प्रतिनिधी : –
ऑनलाइन औषध विक्री बाबत कोणतीही कायद्यात तरतूद नसताना केंद्र सरकार इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्री बाबत जी एस आर अंतर्गत नोटिफिकेशन जारी केले आहे. परंतु त्याचे अद्याप कायद्यात रूपांतर नसतानाही देशभरात सर्रासपणे बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे, ही औषध विक्री न्यायालयाने स्थगिती देऊन सुद्धा बंद झाली नाही. ही औषध विक्री बंद झाली पाहिजे, केमिस्ट असोशियनने वारंवार मागणी करूनही केंद्र सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने जीएसआर रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी अखिल भारतीय औषध विक्रेते 20 मे 2026 रोजी देशव्यापी बंद करणार असल्याची माहिती सातारा जिल्हा केमिस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील यांनी दिली.
अखिल भारतीय औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात हा बंद पुकारण्यात आला असून सातारा जिल्ह्यातील सर्व केमिस्टं व ड्रगिष्ट असोसिएशन चे पदाधिकारी आपला व्यवसाय बंद करून बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
या बंद बाबत माहिती देताना सागर पाटील यांनी सांगितले की ऑनलाईन औषध विक्री बाबत दिल्ली उच्च न्यायालयाने न्यायालयात रीट पेटिशन दाखल करण्यात आले असून दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीला स्थगिती दिली आहे परंतु सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने संघटनेने संघटनेने याबाबत देशीव्यापी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
करोना काळात जी एस आर काढून सरकारने औषधाची होम डिलिव्हरी देण्याबाबत विशेष सूट दिली होती कोरोना संपून आज पाच वर्षे उलटल्यानंतर ही नोटिफिकेशन रद्द करणे गरजेचे असताना व सरकारकडे वारंवार मागणी करूनही ते रद्द करण्यात आले नाही त्याचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन कंपन्या स्वतःचे भाग भांडवल घालून औषध विक्रीचा व्यवसाय करत आहेत त्यामुळे छोटे मोठे औषध व्यवसायिक मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत परिणामी देशातील संपूर्ण औषध वितरण व्यवस्था धोक्यात येऊ शकते यासाठी हा कायदा रद्द करून औषध व्यावसायिकांना संरक्षण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अखिल भारतीय केमिस्टंट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे संबंधित विभागाचे मंत्री तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना वारंवार निवेदने देऊन त्यांना प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ मागूनही त्याकडे दुर्लक्ष केले यानंतर संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निवेदन देऊन याकडे लक्ष देण्याची विनंती केली परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे संघटने संघटनेस देश व्यापी आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी लागली वरिष्ठ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आवाहन नुसार 20 मे रोजी अखिल भारतीय औषध विक्रेते देशव्यापी बंद ठेवणार आहेत असेही सागर पाटील यांनी सांगितले.



