आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्रसातारा जिल्हा

शिक्षण क्षेत्रातील पितामह हरपले : बी टी किणीकर सरांना कराडकरांकडून श्रद्धांजली

कराड / प्रतिनिधी  : –

शिक्षण क्षेत्रातील पितामह, शिक्षण महर्षी अशी ओळख असलेले यशवंत विद्यापीठ, कराड व प्रियदर्शिनी शिक्षण संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी  बी. टी. किणीकर सर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

गेल्या सुमारे सहा दशकांपासून किणीकर सर शिक्षण क्षेत्रात अखंडपणे कार्यरत होते. शिक्षण ही केवळ नोकरी नसून ती एक सेवा आहे, या भावनेतून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. त्यांच्या दूरदृष्टी, शिस्तप्रियता आणि कार्यतत्परतेमुळे अनेक शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या आणि त्यातून समाजाला सक्षम, सुशिक्षित पिढी मिळाली.

साधेपणा, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता ही त्यांची खरी ओळख होती. त्यांनी केवळ शिक्षण दिले नाही, तर मूल्येही दिली. त्यामुळेच विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या मनात त्यांनी विशेष स्थान निर्माण केले.

त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र त्यांनी उभारलेली संस्थात्मक परंपरा आणि दिलेले संस्कार हेच त्यांचे खरे स्मारक ठरणार आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. किणीकर सरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Articles