जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालयास अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची सदिच्छा भेट

कराड/प्रतिनिधी : –
जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सदिच्छा भेट दिली. अमेरिकेतील डॉ. अनुराधा गणेशन यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या १४ सदस्यीय विशेष शिष्टमंडळाचे महाविद्यालयाच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, कृष्णा विश्व विद्यापीठच्या उपसंचालक अर्चना कौलगीकर आणि उपकुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांनी विशेष सादरीकरणाद्वारे महाविद्यालयात राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक, संशोधनात्मक आणि शेतीपूरक उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
त्यानंतर शिष्टमंडळातील सदस्यांनी महाविद्यालयाच्या विविध विभागांना भेटी देऊन सुविधांची पाहणी केली. तसेच कृषी पदवीच्या शेवटच्या वर्षातील ‘अनुभवजन्य शिक्षण कार्यक्रमातील’ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. शिष्टमंडळाने महाविद्यालयाच्या विविध विभागांची पाहणी केली. कृषि पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या ‘अनुभवजन्य शिक्षण कार्यक्रमांतर्गत’विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेत शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि शेतीविषयक उपक्रमांमधील परिश्रमांचे पाहुण्यांनी विशेष कौतुक केले
या सदिच्छा भेटी प्रसंगी अमेरिकेतील उच्चस्तरीय लष्करी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यामध्ये शिष्टमंडळ प्रमुख डॉ. अनुराधा गणेशन यांच्यासह कर्नल गाइस्ट चेर्जे चारला, डॅनिएल रॉबर्ट लाँगमायर, बुद्धिका राजीव अबेयरत्ने, कमांडर डेव्हिड हारलिंग क्रेग तिसरे,वॉरेन ब्लेक वू, कॅप्टन जूंग हून चोई, जेराल्ड माइल्स बॉव्हर्स ज्युनियर, एमिली ॲन जाबेरी, जेसिका लिन हॅल्पेन, मेजर टॅटियाणा व्हिलालोबॉस,जॉय मॅरी बॉटिस्टा, मेगन मॅकेन्झी बाईस आणि कॅरोलिन मारिया मॅकेन्ना आदी सहभागी होते.



