सातारा जिल्हाहोम

तन्वीराजे पिसाळचे होमी भाभा स्पर्धेत सुवर्ण यश

ब्रिलिएंट क्लासेसच्या विद्यार्थिनींची राज्यभर छाप

कराड/प्रतिनिधी : –

विज्ञानातील जिज्ञासा, तर्कशुद्ध विचारसरणी आणि निरीक्षण क्षमतेचा कस पाहणाऱ्या प्रतिष्ठित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत कराडच्या विद्यार्थिनींनी दैदिप्यमान यश संपादन करत शहराचा मान उंचावला आहे. ब्रिलिएंट क्लासेसच्या कुमारी तन्वीराजे प्रकाश पिसाळ हिने सुवर्णपदक पटकावत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर कुमारी माही महेश जाधव हिने रौप्यपदक जिंकत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.

ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन (GBSTA) तर्फे १९८१ पासून आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. चार टप्प्यांत पार पडणाऱ्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाबरोबरच समस्यांकडे तर्कशुद्ध आणि अभ्यासू दृष्टीने पाहण्याची क्षमता विकसित केली जाते.

तन्वीराजे पिसाळ हिने सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या कामगिरीमुळे संस्थेचे नाव राज्यभर गाजले आहे. त्याचप्रमाणे माही जाधव हिनेही उत्कृष्ट प्रदर्शन करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

या यशाबद्दल संस्थेच्या वतीने दोन्ही विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशामागे पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. भविष्यातही अशाच प्रकारे अधिकाधिक विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवतील, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला.

दरम्यान, ब्रिलिएंट क्लासेस, कराड येथे १५ एप्रिलपासून नवीन फाउंडेशन बॅचेस सुरू होत असून, प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत. इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. इयत्ता सहावी व नववीतील विद्यार्थ्यांसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेत मराठी व इंग्रजी माध्यमातून सहभागाची सुविधा असून, विविध शिक्षण मंडळांतील विद्यार्थ्यांसाठी ती उपलब्ध आहे. त्यामुळे या स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असतो.

Related Articles