आयुष्यमान स्पेशलसातारा जिल्हाहोम
कराडातील गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करणार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन पाटील यांची ग्वाही

कराड / प्रतिनिधी : –
संवेदनशील अशी ओळख असलेल्या कराड शहरातील गुन्हेगारांसह अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन केले जाईल. रेकॉर्डवरील गुन्हेगार व अधिक गुन्हे असणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्कासह तडीपार सारख्या कारवाया केल्या जातील असा इशारा कराड शहर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी दिला
कराड शहर पोलीस ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. के.एन.पाटील यांची नुकतीच जिल्हा विशेष शाखा,सातारा येथून कराड शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. के.एन.पाटील हे मूळचे तासगाव तालुक्यातील अंजनी या गावचे सुपुत्र आहेत. मुंबईसह सातारा,सांगली,कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये त्यांनी सेवा बजावली आहे. आपल्या सेवा कालावधीमध्ये त्यांनी अनेक गुन्हेगारांवर जरब बसवली आहे.
कराड शहरातील गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करणे आणि गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सारख्या मोहिमा राबविणे तसेच अवैध धंद्याविरोधातही कठोर कारवाई करून असे अवैध धंदे कराड शहरात हद्दपार करण्यासाठी आपले पहिले प्राधान्य राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.