शिक्षक सोसायटीच्या अध्यक्षपदी सागर पाटोळे, उपाध्यक्षपदी अंकुश नांगरे बिनविरोध

कराड/प्रतिनिधी : –
कराड-पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सागर पाटोळे, तर उपाध्यक्षपदी अंकुश नांगरे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनिमित्त त्यांना विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यनेते उदय शिंदे, शिक्षक संघाचे सरचिटणीस प्रदीप घाडगे, सातारा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन किरण यादव, सातारा जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय पाटील, कराड तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष संजय नांगरे, माजी चेअरमन संचालक दिनेश थोरात, शशिकांत तोडकर, वैशाली पवार, रमेश जाधव, दत्तात्रय जाधव, भारत देवकांत, आनंद चाळके, प्रदीप कुंभार, धनाजी कोळी, संतोष यादव, नीलम नायकवडी, रुक्मिणी सातपुते, पल्लवी यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना उदय शिंदे म्हणाले, मागील तीन वर्षांपासून कराड-पाटण शिक्षक सोसायटीचा कारभार अत्यंत पारदर्शक व सभासद हित जपणारा राहिला आहे. संचालक मंडळाने सभासदांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील राहून चांगला डिव्हिडंट दिला आहे. तसेच संस्थेच्या सर्व कर्जांचे व्याजदर एक अंकी करण्यात आले असून, ही बाब सभासदांसाठी अत्यंत दिलासादायक ठरली आहे.
कार्यक्रमास सतीश गवळी, ज्ञानबा ढापरे, तानाजी पाटील, प्रदीप रवलेकर, रमेश देसाई, व्यवस्थापक श्रीधर यादव, उपव्यवस्थापक उमाकांत फल्ले, पाटण शिक्षक समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण, संजय साठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात उत्साही वातावरणात नव्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
संस्थेच्या लौकिकात भर घालणारा कारभार करू
कराड-पाटण प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी ही महाराष्ट्रात नावाजलेली अर्थवाहिनी आहे. या सोसायटीचा कारभार संपूर्ण महाराष्ट्रातील नोकरदारांच्या संस्थांमध्ये मार्गदर्शक आहे. त्यामुळे या संस्थेच्या हिताला आणि नावलौकिकाला साजेसा कारभार करून संस्था उन्नतीकडे देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष, उपाअध्यक्षांनी दिली.



