आयुष्यमान स्पेशलमनोरंजनमहाराष्ट्र

अमित कुलकर्णी ‘गौरव रत्न’ पुरस्काराने सन्मानित

 

कराड / प्रतिनिधी : –
रत्नशास्त्रामध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल (धामणी ता.पाटण) येथील ज्योतिषाचार्य वेदमूर्ती अमित वसंत कुलकर्णी यांना ‘गौरव रत्न’, ‘ज्योतिष सम्राट’,’ज्योतिष भास्कर’ व ‘विशेष विद्यार्थी’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
   पुणे येथे जयसिंगराव चव्हाण दहावी आंतरराष्ट्रीय ज्योतिष अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात दिल्लीचे विश्व विशारद ज्योतिष तज्ञ डॉ.एच.एस.रावत, द ग्रेट एस्ट्रोलॉजी आदिनाथ साळवी, गुरुवर्य दत्तप्रसाद चव्हाण व कोल्हापूरचे प्रसिद्ध उद्योजक प्रदीप देसाई यांच्या हस्ते ज्योतिषाचार्य वेदमूर्ती अमित कुलकर्णी यांना ‘गौरव रत्न’, ‘ज्योतिष सम्राट’,’ज्योतिष भास्कर’ व ‘विशेष विद्यार्थी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अमित कुलकर्णी यांनी रत्नशास्त्रामध्ये सखोल अभ्यास केला आहे. रत्नशास्त्रामध्ये केलेल्या या विशेष कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.या अधिवेशनात चंद्रकांत शेवाळे, अष्टक वर्ग प्रसिद्ध ज्योतिषी तज्ञ प्रदीप पंडित, केपी तज्ञ गौरी केंजळे, युवा ज्योतिष वेदांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. अमित कुलकर्णी यांना गौरव रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय,ज्योतिषी क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles