सातारा जिल्हाहोम

पृथ्वीराज चव्हाण यांची श्रीनिवास कुलकर्णी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

साहित्यिक योगदानासह आठवणींना दिला उजाळा

कराड/प्रतिनिधी : – 

ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या साहित्यिक कार्याचा आणि साहित्यविश्वातील योगदानाचा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी कुलकर्णी कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधला. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या साहित्यिक कारकिर्दीतील विविध पैलूंची आठवण त्यांनी जागवली. तसेच कुटुंबीयांकडून त्यांच्या साहित्यिक प्रवासातील अनेक आठवणी जाणून घेतल्या.

साहित्य क्षेत्रात श्रीनिवास कुलकर्णी यांनी दिलेले योगदान मोलाचे असून, त्यांच्या साहित्यकृती आणि विचारांच्या माध्यमातून त्यांची स्मृती दीर्घकाळ जिवंत राहील, अशी भावना चव्हाण यांनी व्यक्त केली. कुलकर्णी यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी साहित्य क्षेत्रासाठी निश्चितच जाणवणारी आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी कुलकर्णी कुटुंबीयांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवाद साधत श्रीनिवास कुलकर्णी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Related Articles