आयुष्यमान स्पेशलसातारा जिल्हा

‘कोटा’ ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे ‘जेईई’त यश 

कराड /प्रतिनिधी :-
जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, कराड येथील कोटा ॲकॅडमी मधील ४ विद्यार्थी जेईई अडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. दमयंती पाटील, सौदा वाईकर, जीवा कांबळे, ऐश्वर्या काशीद हे विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झाले आहेत.
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये इयत्ता नववी व अकरावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये इयत्ता ९ वी मध्ये रिया निलेश थोरात या विद्यार्थिनीने ९५.३३ टक्के तर ११ वी मध्ये दिया हितेश पटेल या विद्यार्थिनीने ९ टक्के गुण प्राप्त करून अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा कोटा ॲकॅडमी व कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराडचे संचालक डॉ. महेश खुस्पे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ॲकॅडमीच्या संचालिका मा. सौ. मंजिरी खुस्पे, कु. मैथिली खुस्पे, प्राचार्या सौ. जयश्री पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
२००६ पासून कराड येथे कोटा ॲकॅडमी कार्यरत असून गेल्या १८ वर्षांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी आयआयटी-जेईई, नीट, एमएच – सीइटी, एनडीए यासारख्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे.
कोटा अॅकॅडमी मध्ये इयत्ता ८ वी, ९ वी १० वी या वर्गांची फाउंडेशन पासूनची तयारी करून घेतली जाते. त्यामुळे आयआयटी-जेईई-नीट- एमएचटी- सीईटी, एनडीए यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी होते. इयत्ता ८ वी ते १२ वी या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. फाऊंडेशनची बॅच चालू होणार असून अकरावीची सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

Related Articles