आयुष्यमान स्पेशलआरोग्य धनसंपदा
Trending

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड, येथे ‘मधुस्नेह’ या डायबिटीज केअर क्लिनिकचे उद्घाटन

कराड/प्रतिनिधी :–

कराड आणि सातारा जिल्ह्यातील लोकांपर्यंत उत्कृष्ट आरोग्य सेवा पोहोचवणारे एक विश्वासार्ह नाव म्हणून सुपरिचित असणाऱ्या सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड येथे आज ‘मधुस्नेह’ या अत्याधुनिक डायबिटीज केअर क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. सातारा जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना मधुमेहासाठी विशेष काळजी आणि यशस्वी उपचार देण्यासाठी हे क्लिनिक समर्पित असेल.
या क्लिनिकचे उद्घाटन पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटल्सचे एंडोक्रिनोलॉजी आणि मधुमेह विभागाचे संचालक असणाऱ्या डॉ. उदय फडके यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी सह्याद्रि हॉस्पिटल कराडचे संचालक – मा.दिलीप(भाऊ) चव्हाण, सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील राव, जनरल मॅनेजर – ऑपरेशन्स – डॉ. वेंकटेश मुळे, कॅन्सलटिंग फिजिशियन तथा मधुमेह तज्ञ – डॉ. महेश देशमुख, आणि कन्सलटिंग फिजिशियन – डॉ. राम देसाई हे उपस्थित होते.
‘मधुस्नेह’ या अत्याधुनिक डायबिटीज केअर क्लिनिकचे लोकार्पण हे सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. सातारा जिल्ह्यातील मधुमेही रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या प्रचलित आव्हानांना तोंड देत लोकांना आदर्श आरोग्य सेवा देण्यासाठी हे क्लिनिक मदत करेल. ‘मधुस्नेह’ हे समाजाच्या आरोग्यीक कल्याणाप्रती असलेल्या रुग्णालयाच्या निरंतर वचनबद्धतेचा दाखला देईल.
मधुमेह हा भारतासह जगभरातील लोकांच्या आरोग्याच्या चिंतेचा प्रमुख विषय बनला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते, भारतात 77 दशलक्ष मधुमेही रुग्ण आहेत आणि येत्या काही वर्षांत ही संख्या अधिक वाढण्याची धोका आहे. सर्वदूर पसरलेल्या या आजारापासून सातारा जिल्हा आणि त्याचा परिसर देखील आता अस्पर्शीत राहिलेले नाही. मधुमेही रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मधुमेह व्यवस्थापनाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष आरोग्य सुविधांची तातडीची गरज आहे. ‘मधुस्नेह’ डायबिटीज केअर क्लिनिक या परिसरातील ही गंभीर पोकळी भरून काढू शकते आणि एकाच छताखाली सर्वसमावेशक सुविधा देऊ शकते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटल्सचे एंडोक्रिनोलॉजी आणि मधुमेह विभागाचे संचालक – डॉ. उदय फडके यांनी मधुमेहाविरुद्धच्या लढ्यात अशा विशेष काळजीवाहू क्लिनिक्सचे महत्त्व यावेळी विषद केले. ते म्हणाले, “मधुमेहाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांना सर्वोत्कृष्ट काळजी आणि सहाय्य मिळावे यासाठी वैद्यकीय समुदायाकडून सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथील ‘मधुस्नेह’ डायबिटीज केअर क्लिनिक मधुमेही रुग्णांना सुयोग्य काळजी प्रदान करण्यात, त्यांना निरोगी जीवन जगण्यास मदत करेल.”
या प्रसंगी बोलताना, सह्याद्रि हॉस्पिटल कराडचे संचालक मा.दिलीप(भाऊ) चव्हाण म्हणाले, “मधुस्नेह डायबेटिज केअर क्लिनिक हे आपल्या परिसरातील मधुमेही रुग्णांना प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट आणि डायबेटिक फूट सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सुविधा प्रदान करेल. येथील तज्ञ वैद्यकीय पथक रुग्णांना योग्य आहार सल्ला, पाय आणि डोळ्यांची काळजी, वजन नियंत्रित करणे, रक्तदाब आटोक्यात ठेवणे यासाठी मदत करेल. हे क्लिनिक रुग्णांना उच्च गुणवत्तेच्या आरोग्य सुविधा परवडणाऱ्या दरात देऊ करेल.”

मधुमेही रुग्णांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित असलेल्या या क्लिनिकची रचना अत्यंत कुशल आशा डॉ. महेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विचारपूर्वकपणे तयार करण्यात आली आहे. डॉ. उदय फडके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसमावेशक प्रशिक्षण घेतलेल्या डॉ. देशमुख यांना ‘मधुस्नेह’ क्लिनिकमूळे मधुमेह व्यवस्थापनासाठी रुग्णांनी वैयक्तिक काळजी आणि सर्वांगीण दृष्टीकोन स्वीकारण्याची आशा आहे.
तसेच अधिकाधिक रुग्णांना या अत्याधुनिक डायबिटीज केअर क्लिनिकचा लाभ घेत यावा यासाठी 25 जुलै ते 31 ऑगस्ट 2023 या दरम्यान रु.999/- चे विशेष सवलत पॅकेज रुग्णांसाठी या प्रसंगी जाहीर करण्यात आले.
‘मधुस्नेह’ या अत्याधुनिक डायबिटीज केअर क्लिनिकच्या माध्यमातून आपल्या रुग्णांना अभिनव व उत्कृष्ट देखभाल सेवा पुरवण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल्स वचनबद्ध आहे. असे अभिनव उपक्रम आमच्या रुग्णांना उपचारांमधून मिळणाऱ्या परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणण्याप्रती आमची निष्ठा दर्शवते.

Related Articles