सातारा जिल्हाहोम

युवा विकास प्रतिष्ठानच्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शासकीय योजना व आरोग्य तपासणी उपक्रमाचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्याकडून कौतुक

कराड/प्रतिनिधी : – 

सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, प्रभावी आणि लोकाभिमुख पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने युवा विकास प्रतिष्ठान, कराड यांच्या वतीने शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती, नागरिकांच्या अडचणींचे निराकरण तसेच आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी नगरसेवक प्रवीण पवार, नरेंद्र लिबे, सुधीर काका एकांडे, रूपेश मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी, युवा विकास प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, प्रशासन जनतेच्या दारी पोहोचवून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांविषयी जागरूकता निर्माण होण्यासोबतच आरोग्यविषयक सेवांचाही लाभ मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles