सातारा जिल्हाहोम

गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर ‘कृष्णा’ची कौतुकाची थाप

कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार

कराड/प्रतिनिधी : –

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या पाल्यांनी इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते त्यांचा गुरुवारी (ता. १४) सत्कार करण्यात आला.

कृष्णा कारखान्याच्यावतीने इयत्ता १२ वी मधील गुणवंत विद्यार्थी मानसी पाटील व १० वी मधील गुणवंत विद्यार्थी सिमरन मुल्ला, गौरव पाटील, प्रियांका पाटील, स्वरा पाटील, असिया मुल्ला, अपूर्वा पाटील, हर्षित यादव, सृष्टी कोळेकर, अनुज कळंबे, अक्षरा पाटील, श्रावणी मुळीक, मनस्वी पवार, आर्या मोरे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

याप्रसंगी संचालक संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, जे. डी. मोरे, विलास भंडारे, श्रीरंग देसाई, सयाजी यादव, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, दीपक पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

संचालक मंडळाने विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रेरणादायी पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एच. आर. मॅनेजर संदिप भोसले यांनी स्वागत केले. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी आपल्या मनोगतात विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मोहन कदम यांनी आभार मानले.

Related Articles