सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारख्यान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह संपन्न

कराड/प्रतिनिधी : –

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह संपन्न झाला. कर्मचार्‍यांना यावेळी औद्योगिक सुरक्षिततेची शपथ देण्यात आली. कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीय सप्ताहानिमीत्त मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार कामगार सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना म्हणाले, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ कामगारांची नेहमी काळजी घेत असते. त्यांना उच्च दर्जाची सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सुरक्षितता व उत्पादकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. उत्पादकते एवढेच सुरक्षिततेला महत्व आहे. कर्मचारी व अधिकारी यांनी अपघात टाळून सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दरम्यान अग्निप्रतिबंधक उपकरणे हाताळणे याचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमावेळी जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, सेक्रेटेरी सिध्देश्वर शिलवंत, जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, जनरल मॅनेजर डिस्टिलरी विकास आभाळे, प्रोडक्शन मॅनेजर विकास फडतरे, चीफ इंजिनिअर पंडित पाटील, फायनान्स मॅनेजर राजाराम चन्ने, एच.आर. मॅनेजर संदीप भोसले, को-जन मॅनेजर गिरीश इस्लामपुरकर, परचेस मॅनेजर विक्रमसिंह माने, सुरक्षा व पर्यावरण अधिकारी सुयोग खानविलकर, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सीनियर सिव्हिल इंजिनियर जयवंत शिंदे, वैद्यकीय अधिकारी हर्षल निकम, संरक्षण अधिकारी संजय नलवडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Related Articles