मत्यापूर येथे महिला दिनानिमित्त महिलांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात
दहा हजारा पेक्षा जास्त महिलांची उपस्थिती; महिलांचे समाजसुधारण्यात मोठे योगदान आ.मनोज घोरपडे

कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर मतदारसंघातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक यांचा महिला दिनानिमित्त भव्य सन्मान सोहळा मत्यापूर येथे उत्साहात संपन्न झाला. समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला भगिनींचाही यावेळी गौरव करण्यात आला. महिलांसाठी विशेष मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दहा हजारा पेक्षा जास्त महिला भगिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
हा कार्यक्रम स्वा. महिला सखी मंच व आ. मनोजदादा घोरपडे युवा मंच, कराड उत्तर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या व भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ. डॉ. प्रिया शिंदे, स्वा. सखी मंच अध्यक्षा सौ. समता घोरपडे, श्रीमती मंगलताई घोरपडे, तेजस्विनी घोरपडे, नगराध्यक्ष वैशाली माने आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच जिल्हा परिषद सदस्य माधवराव निवृत्ती काळभोर, नागठाणे, अजित सदाशिव साळुंखे, रणजित कृष्णराव जाधव ,उंब्रज, सौ. तेजस्विनी विक्रमशील कदम, पुसेसावळी, श्री. लालासाहेब विष्णुपंथ जगदाळे, मसूर, सागर भिमराव शिवदास, सैदापूर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
पंचायत समिती सदस्यांमध्ये सौ. सुषमा गणेश जाधव,अतित, मानसिंग विठोबा मोरे, अपशिंगे (मि), संतोष शंकर पाटील, वडोली भि, कोमल प्रशांत यादव, डॉ. प्रगती चंद्रकांत कोकाटे-पाटील, म्हासुर्णे, धैर्यजा स्वप्निल माने चरेगाव, अनिता सतीश वेताळ , वाघेरी, प्रियांका सागर पळसे, हजारमाची, माधवी नाना पाटसुपे, सैदापूर यांचा सन्मान करण्यात आला.
नगरसेवक किशोरी अतुल शिंदे कोमल तुषार चव्हाण, वनिता सतीश भोसले, भाग्यश्री अशोक शेरकर, योगिता विजय लोहार, नाना एकनाथ राऊत, रणजीत शिवाजी माने, मयुरेश सुनील माने, सुरज अनिल गायकवाड, निलेश संपतराव माने, किरण शिवाजीराव भोसले यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कराड उत्तर मतदारसंघातील हजारो महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी विविध सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रमांमुळे कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, महिला आज प्रत्येक क्षेत्रात मोठ्या ताकदीने पुढे येत आहेत. समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. कराड उत्तर मतदारसंघात महिलांना सन्मान, संधी आणि नेतृत्व मिळावे यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. महिला सक्षम झाल्या तर समाज व देश अधिक सक्षम होईल. महिला भगिनींनी समाजकार्यात व विकासकामात सक्रिय सहभाग घ्यावा.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्वा. महिला सखी मंच व आ.मनोजदादा घोरपडे युवा मंच, भाजपा कराड उत्तर यांच्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी कौतुक केले.



