सातारा जिल्हाहोम

कराड नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी जिल्हास्तर नगरोत्थान महाभियान अंतर्गत ८८ लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता

कराड/प्रतिनिधी : – 

सातारा जिल्हा नियोजन समितीकडून तसेच पालकमंत्री महोदय ना. शंभूराज देसाई साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कराड नगरपरिषदेच्या विविध विकास कामांसाठी जिल्हास्तर नगरोत्थान महाभियान अंतर्गत एकूण ८८ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या कामांना अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे , अशी माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, कराड शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नांतून या निधीला मंजुरी मिळाली आहे. सदर निधीतून कराड शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, रस्ते दुरुस्ती व सुधारणा, गटारी बांधकाम, सार्वजनिक सुविधा उभारणी आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत.

या विकासकामांमुळे कराड शहरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून संबंधित कामे लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कराड शहराच्या प्रगतीसाठी सर्व संबंधित विभागांचे सहकार्य लाभत असून आगामी काळातही विकासाच्या विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.

Related Articles