सातारा जिल्हाहोम

सैदापूरला विकासाचे रोलमॉडेल बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – जयकुमार गोरे

कराड/प्रतिनिधी : –

सैदापूर, ता. कराड या गावाला विकासाचे रोलमॉडेल बनवण्यासाठी ग्रामविकास विभाग अंतर्गत असणारे सर्व उपक्रम राबवून राज्यात विकासाचे रोल मॉडेल बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

ना. जयकुमार गोरे कराड दौऱ्यावर असताना सैदापूरचे सरपंच पत्तेसिंह जाधव यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी आ. डाॅ. अतुल भोसले, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, माजी सदस्य भीमराव पाटील, बनवडीचे सरपंच प्रदीप पाटील, पांडुरंग कोठावळे, रणवीर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान सातारा व जिल्हा व जिल्हा परिषद सातारा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने आयोजित केलेल्या मिनी सरस जत्रा या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी सैदापूरनगरीस भेट दिली. याप्रसंगी त्यांनी सैदापूर ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 24 बाय सात योजना, सौर ऊर्जा प्रकल्प, अंतर्गत सिमेंट रस्त्यांची जोडणी आणि इतर सर्व उपक्रमांची माहिती घेतली.

याचबरोबर सैदापूरच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या बाबींचीही सरपंच फत्तेसिंह जाधव यांच्याकडून माहिती घेतली आणि सैदापूरला विकासाचे रोलमॉडेल बनवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला उपसरपंच अनिल जाधव यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांच्या सहकार्याने आदर्श सैदापूर बनवूया!

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व कराड दक्षिणचे आ.डॉ. अतुल भोसले यांच्या सहकार्याने सैदापूरनगरी विकासाचे रोलमॉडेल बनवून विद्यानगरी सैदापूरचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर चमकत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार. – फत्तेसिंह जाधव (सरपंच, सैदापूर)

Related Articles