साताऱ्यात ब्रिलियंट अकॅडमीचा झेंडा; जेईई मेनमध्ये आर्यन पाटील जिल्ह्यात प्रथम

कराड/प्रतिनिधी : –
येथील ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्याने जेईई मेन २०२६ परीक्षेत घवघवीत यश संपादन करत सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आर्यन मोहन पाटील याने ९९.१० पर्सेंटाइल गुण मिळवत ही उल्लेखनीय कामगिरी केली. सातत्याने गुणवत्तेची परंपरा जपणाऱ्या ब्रिलियंट अकॅडमीसाठी हा आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.
अकॅडमीतील एकूण ३२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण करून जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्रता मिळवली आहे. या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे उपाध्यक्ष मोहन पाटील, पत्रकार प्रकाश पिसाळ, मुख्याध्यापिका रुपाली पाटील, भौतिकशास्त्र विभागप्रमुख आदित्य रंजन, रसायनशास्त्र विभागप्रमुख निलेश कुमार, गणित विभागप्रमुख स्वप्नील अग्रवाल, जीवशास्त्र विभागप्रमुख नील सर तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आर्यन पाटील (९९.१०), सोहम नदाफ (९८.५५), सोहम फणसेकर (९८.१२), बुषारा वायकर (९६.०३), आलिया पिरजादे (९६.४६), आर्यन निकम (९३.७८), पियुष कुंभार (९२.२१), अंशुल सूर्यवंशी (९१.४०), सुजल झांबे (८८.७०), वर्षा चव्हाण (८७.४४), सिद्धी मोरे (८६.४८), आरसावी बांदे (८६.३६), समीक्षा भांबुरे (८६.३२), श्रवण जाधव (८५.५६), धनश्री कावरे (८३.८३), आर्यन धिगारे (८३.४८), श्रद्धा मोरे (८३.३७), संदेश लोहार (८३.२४), सागर थोरात (८२.८८), माधवी रोकडे (८२.०५), अथर्व पाटील (८१.६३) आणि वेदांत पाटील (७९.४२) यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे आऱ्यन पाटील हा ब्रिलियंट फाउंडेशन स्कूलचा पहिला विद्यार्थी असून त्याने जेईई मेनमध्ये जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. फाउंडेशन अभ्यासक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होत असल्याचे यशातून अधोरेखित झाले आहे. होमी भाभा, स्कॉलरशिप, एनटीएसई यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्येही अकॅडमीने सातत्याने यश मिळवले आहे.
आर्यन चे प्राथमिक शिक्षण नगरपालिका शाळा क्रमांक ३ येथे झाले. इयत्ता आठवीपासून फाउंडेशन अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन मिळाल्याने पुढील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम तयारी झाल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, येत्या १५ एप्रिलपासून इयत्ता ६ वी ते १० वी फाउंडेशन वर्ग सुरू होणार असून पालकांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
या यशाबद्दल ब्रिलियंट अकॅडमीच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करत जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.


