शिक्षक सोसायटीच्याअध्यक्ष पदी रुक्मिणी सातपुते,तर उपाध्यक्ष पदी निलम नायकवडी

कराड पाटण शिक्षक सोसायटीच्या नूतन चेअरमन पदी रुक्मिणी सातपुते व्हा चेअरमन निलम नायकवडी यांच्या सत्कार प्रसंगी जिल्हाध्यक्ष विश्वभर रणनवरे, प्रदीप घाडगे, मोहनराव सातपुते, दिनेश थोरात आदी
ओगलेवाडी / प्रतिनिधी :-
महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांच्या बँकेमध्ये अग्रेसर असलेल्या कराड–पाटण शिक्षक सोसायटीच्या अध्यकपदी सौ. रुक्मिणी मोहन सातपुते यांची तसेच व्हाईस चेअरमनपदी निलम नायकवडी यांची बहुमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे कराड पाटण सोसायटीवर महिलेला संधी मिळाली असून 50 टक्के पेक्षा जास्त महिला सभासद असणाऱ्या या बँकेचे नेतृत्व महिलेच्या हातात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या अगोदर कराड पाटण शिक्षक सोसायटीचा कारभार महिलेच्या हातामध्ये दिल्याने शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे
या वेळी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे व शिक्षक संघांचे नेते प्रदीप घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कराड पाटण प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या अध्यक्षांनी उपाध्यक्ष पदाच्या निवडी नुकत्याच पार पडल्या अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या निवडी पार पडून सातपुते यांना अध्यक्षपदाचा तर नायकवडी यांना उपाध्यक्ष पदाचा मान मिळाला सभासद हिताचा कारभार करून त्या सोसायटीला नावलौकिक पिळून देण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार या दोघांनी यावेळी व्यक्त केला या निवडी वेळी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा कोषाध्यक्ष मोहन सातपुते, शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन आनंदा चाळके, माजी व्हाईस चेअरमन एम. डी. दडस, संचालक दिनेश थोरात, शशिकांत तोडकर, अंकुश नांगरे, भारत देवकांत,प्रवीण मोरे, वैशाली पवार, पल्लवी यादव,दत्तात्रय जाधव,वनिता अपशिंगे,रमेश जाधव, प्रदीप कुंभार, सागर पाटोळे, धनाजी कोळी,आदिसह सर्व संचालक मंडळ, शिक्षक सभासद उपस्थित होते. मॅनेजर उमाकांत फल्ले, असिस्टंट मॅनेजर श्रीधर यादव यांच्यासह, संघटना पदाधिकारी, अनेक शिक्षक बांधव व मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शिक्षक संघांचे नेते संभाजीराव थोरात, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी व पारदर्शक कामकाज सुरु असणारी प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या सदर शिक्षक सहकारी सोसायटीमध्ये सभासद हीत जोपासात संचालक मंडळ उल्लेखनीय कामकाज करीत आहे. वरिष्ठ नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सदर निवडी उत्साही वातावरणात पार पडल्या.
यावेळी नूतन चेअरमन रुक्मिणी सातपुते यांनी सभासद हीत डोळ्यासमोर ठेवून, संस्थेमध्ये पारदर्शक कामास प्राधान्य देईन अशी ग्वाही दिली.
नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करत शिक्षकांच्या हितासाठी भरीव व सकारात्मक कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.



