आदरणीय पी. डी. पाटील यांची 17 रोजी पुण्यतिथी

कराड/प्रतिनिधी : –
आधुनिक कराडनगरीचे आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांची 16 वी पुण्यतिथी मंगळवार, दि. 17 सप्टेंबर रोजी आहे. या पुण्यतिथी निमित्ताने आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवार, दि. 12 रोजी श्री शिवाजी विद्यालय, कराड येथे झाली.
या बैठकीला स्मारक समितीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब पाटील, सदस्य डॉ. अशोकराव गुजर, अॅड. मानसिंगराव पाटील, शेखर देशपांडे, मुकुंदराव कुलकर्णी, संभाजीराव सुर्वे, जगन्नाथ माने, महेंद्रकुमार शहा, अमोल सोनवले व सचिव अल्ताफ हुसेन मुल्ला आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते. दि. 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब समाधीस्थळ, श्री शिवाजी विद्यालय, कराड येथे आयोजित केला आहे. तरी आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब स्मारक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.