सातारा जिल्हाहोम

रेणुका लाड यांना यशवंतराव चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान 

कराड/प्रतिनिधी : –

कराड पंचायत समिती यांच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा स्व. यशवंतराव चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार – 2024 रेठरे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या (मुली) उपशिक्षिका सौ. रेणुका प्रशांत लाड यांना देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) अनिस नायकवडी, दि कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

रेणुका लाड यांनी 25 वर्षे काम करताना नेहमी विद्यार्थी व पालक केंद्रबिंदू मानून काम केले. हा पुरस्कार आतापर्यंत काम केलेल्या सर्व शाळांमधील सहकारी शिक्षक, अधिकारी, पालक वर्ग विद्यार्थी व नातेवाईक यांचा असल्याचे रेणुका लाड यांनी सांगितले.

Related Articles