आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यासातारा जिल्हा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांने साजरा 

 

कराड / प्रतिनिधी : –

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आज आयोजन करण्यात आले.

संत रोहिदास प्रतिष्ठान संचलित आश्रमशाळा नागझरी ता. कोरेगांव, जि. सातारा. येथे विद्यार्थ्यांसमवेत देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.
कराड उत्तरचे नेते भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ  याच्या मार्फत हा कार्यक्रम राबवण्यात आला.

 

यावेळी भाजपा किसान मोर्चा सातारा जिल्हा उपाध्यक्ष विकास अण्णा गायकवाड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश घोरपडे, भाजपा किसान मोर्चा जिल्हा समन्वयक सूर्यकांत पडवळ, भाजपा किसान मोर्चा कराड उत्तर तालुका अध्यक्ष प्रशांत भोसले, पाली गावचे उपसरपंच सुनील काळभोर, भाजपा कराड उत्तर चिटणीस शंकर पाटील, भाजपा युवा मोर्चा सातारा जिल्हा उपाध्यक्ष रोहित डुबल, भाजपा रहिमतपूर मंडल सचिव सुभाष फडतरे, पैलवान सोमनाथ भोसले रामदास भोसले नागझरी ग्रामविकास संस्थेचे पदाधिकारी निवास भोसले सुधीर भोसले चक्रधर मोरे ज्ञानदेव भोसले बाळासो भोसले, समाधान भोसले, संदीप भोसले, मुक्ताबाई भोसले हायस्कूल चे मुख्याध्यापक अवधूत चेंडके ,संत रोहिदास आश्रम शाळेचे मुख्याध्यापक भीमराव येवले, अधीक्षक बाबुराव घाडगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles