सातारा जिल्हाहोम

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कोरेगाव येथे वृक्षारोपण

कराड/प्रतिनिधी  : –

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज कोरेगाव (ता. कराड) येथे जिल्हा परिषद सदस्या सौ. विजया संताजीराव थोरात यांच्या पुढाकाराने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

“एक वृक्ष – पर्यावरण रक्षणाची शाश्वत दिशा” हा संदेश देत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

या प्रसंगी श्री. संताजीराव थोरात (सावकार), उपसरपंच श्री. दिलीप (डी. बी.) पाटील, माजी उपसरपंच श्री. आनंदराव खाशाबा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रवीण पोपट पाटील, माजी चेअरमन श्री. हणमंत भार्गव पाटील यांच्यासह ग्रामस्थ, महिला, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सौ. विजया थोरात यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “वाढते प्रदूषण आणि बदलते हवामान लक्षात घेता वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. लावलेला प्रत्येक वृक्ष भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरणार आहे.  हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.

Related Articles