सातारा जिल्हाहोम

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी उत्तमराव साळुंखे यांची निवड 

कराड/प्रतिनिधी : –

शेतकरी युवा नेते रविकांत तुपकर संस्थापक असलेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी उत्तमराव साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे . संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे यांनी ही नियुक्ती केली.

उत्तम साळुंखे यांनी 2012 साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सहभागी विविध आंदोलनात सहभाग घेतला. 2013-14 ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आंदोलनाला परवानगी न दिल्याने श्रीक्षेत्र पाचवडेश्वर येथे झालेल्या आंदोलनात पोलिसांचा दबाव झुगारून सक्रिय सहभाग घेतला. 2015 बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय सचिव म्हणूनही काम पाहिले.

2020 पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. परंतु, नव्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या विचाराला व कार्याची तडप पाहून या संघटनेत प्रवेश केला. तुपकर यांनी साळुंखे याची सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्याची सूचना केली.

निवडीनंतर साळुंखे यांनी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या विचाराने मार्गदर्शनाखाली संघटनेत कार्यरत राहणार असून, लवकरच जिल्हा कार्यकारणी नियुक्त करून नव्या आंदोलनाची दिशाही ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले. संघटनेतील कार्यकारणीत ज्यांना काम करावयाचे आहे, त्यांनी आपणाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. या निवडीनंतर त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Related Articles