सातारा जिल्हाहोम

भ्रष्टाचाराविरोधात संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार

कराडमध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

कराड/प्रतिनिधी : –

समाजातील भ्रष्टाचार, अन्याय व गैरव्यवहाराविरोधात लोकशाही मार्गाने संघर्ष अधिक प्रभावी करण्याचा निर्धार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला. समितीचे स्वातंत्र्यसैनिक, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर (बाबा) यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. २३) सायंकाळी बाबुभाई पदमसी हॉल, विठ्ठल चौक, कराड येथे हा मेळावा उत्साहात संपन्न झाला.

यावेळी प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी समितीची उद्दिष्टे व कार्यपद्धती स्पष्ट करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. समाजातील गरीब, गरजू व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या वैयक्तिक समस्या सोडविण्यासाठी मदत करणे तसेच विविध क्षेत्रांतील भ्रष्टाचार व गैरव्यवहार समाजासमोर आणण्यासाठी समिती कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव पी. क्षेत्रे-पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश पाटील, प्रदेश सचिव नम्रता कुलकर्णी, सचिव धनश्री रोकडे, सातारा पूर्व जिल्हाध्यक्ष श्रीनिवास किरकिरे, युवक मीडिया प्रदेशाध्यक्ष संकेत भोसले-पाटील, महाराष्ट्र प्रदेश संघटक रमेश तानाजी बनसोडे आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन शाह यांच्यासह सातारा व कराड परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यात संघटनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Related Articles