केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी धैर्यशील कदमांची भेट
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार रणनीतीवर सविस्तर चर्चा; भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

कराड/प्रतिनिधी : –
राजस्थानातील अलवर येथे केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी शुक्रवारी, दि. २८ रोजी सदिच्छा भेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आगामी अलवर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचार, संघटनात्मक तयारी आणि विविध राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, तसेच राजस्थानचे वनमंत्री संजय शर्मा यांच्यासोबत सातारा-सांगली विधानपरिषदेचे आमदार धैर्यशील कदम यांनी विविध विषयांवर चर्चा केली. निवडणुकीच्या प्रचाराची दिशा, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बांधणी, तसेच कार्यकर्त्यांची भूमिका याबाबतही विचारविनिमय झाल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीस सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, सातारा जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, माजी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, कराड उत्तर कोपर्डे मंडल अध्यक्ष तुकाराम नलवडे, माजी कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, प्रमोद शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ फुटाणे आदी उपस्थित होते.
अलवर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांचा राजस्थानातील निवडणूक प्रक्रियेतील सहभाग आणि पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील समन्वयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.



