सातारा जिल्हाहोम

रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या अध्यक्षपदी राजन वेळापूरे, सचिवपदी संजय बडदरे यांची निवड 

मान्यवरांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा उत्साहात; नूतन सदस्यांचेही स्वागत

कराड/प्रतिनिधी : –

समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक करताना सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि लोकहिताचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त करत रोटरी क्लब ऑफ मलकापूर (कराड)च्या अध्यक्षपदाची सूत्रे राजन वेळापूरे, तर सचिवपदाची सूत्रे संजय बडदरे यांनी स्वीकारली. रोटरॅक्ट क्लब ऑफ मलकापूरच्या अध्यक्षपदी बेंझीर शिकलगार, तर सचिवपदी रोहित पाटील यांनी पदभार स्वीकारला.

रोटरी क्लब ऑफ मलकापूर व रोटरॅक्ट क्लब ऑफ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदग्रहण समारंभात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर २०२७-२८ रो. क्षितिज झावरे आणि असिस्टंट गव्हर्नर २०२६-२७ युवराज नागे यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा झाला.

कार्यक्रमात माजी अध्यक्ष राहुल जामदार यांच्या कार्यकाळातील विविध समाजोपयोगी उपक्रमांचा गौरव करण्यात आला. त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेत नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. माजी सचिव विजय दुर्गावळे यांनी, वर्षभरातील क्लबच्या कार्याचा अहवाल सादर करून नूतन कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्द केला.

यावेळी क्लबमध्ये नव्याने सहभागी झालेल्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामध्ये मुनीर गुलाब बागवान (कालिका कुटुंब प्रमुख), मेजर पतंगराव बानुगडे, सुरेश देसाई, प्रा. डॉ. दिलीपकुमार कसबे, दिलीप चव्हाण, रमेश पाटील, जगन्नाथ पाटील, अभिजीत शिंदे पाटील, शंकर पिसाळ, उत्तम बर्गे, रामचंद्र जाधव, विवेक वेळापूरे (सीईओ, श्री कालिकादेवी पतसंस्था, कराड) आणि सुभाष कदम यांचा समावेश आहे.सन २०२६-२७ साठी रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या संचालक मंडळाचीही यावेळी घोषणा करण्यात आली. संचालक मंडळात विजय चव्हाण, रो. विलासराव पवार, संदीप पाटील, विक्रम औताडे, राहुल जामदार, आनंदराव बागल, भगवानराव मुलीक, सलीम मुजावर, अरुण यादव, विनोद आमले, दिलीप संकल्प, विकास थोरात, उमेश यादव, चंद्रशेखर दोड्डुमणी, विजय जिगाडे, अमर जाधव, सुनील बसुगडे, डॉ. अमोल मोटे, विजय दुर्गावळे, संग्रामसिंह मोरे, डॉ. सतीश संकल्प, शुभांगी शेलार, संभाजी पाटील, महेश दुधाने, विजय मोहिरे, नंदकुमार गायकवाड, किशोर गावंडी, धनाजी देसाई, अतुल पाटील, सी.ए. विनोद सावंत, मनीष कुरकुटे आणि सरोज सोनवले यांचा समावेश आहे.

दरम्यान, श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मलकापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष तेजस सोनवले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य, माजी पदाधिकारी, रोटरॅक्ट सदस्य, विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles