कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे ‘जी-पॅट’ व ‘गेट-२०२६’ परीक्षेत यश

कराड/प्रतिनिधी : –
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसीमधील अंतिम वर्षाच्या (फाउंडेशन बॅच) विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत, ‘जी-पॅट’ आणि ‘गेट-२०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे.
‘जी-पॅट’ परीक्षेत महाविद्यालयातील सई नलवडे हिने ८६४ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. तसेच सानिका पवार (रँक १०२६), अनुजा कुंभार (रँक १६५४), साक्षी नलवडे (रँक २०९५), वैष्णवी वडकर (रँक ३६२३), अनुष्का शिंदे (रँक ४७७३) आणि दिपककुमार दास (रँक ५५०७) यांनीही उत्तम कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
तसेच ‘गेट-२०२६’ परीक्षेत श्रावणी जाधव व सई नलवडे यांनी यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. दोन्ही परीक्षांमधील या यशामुळे विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात नवे दरवाजे खुले झाले आहेत.
यासोबतच पुणे येथे आयोजित आंतरराष्ट्रीय इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत शिवानी नलवडे हिने द्वितीय क्रमांक पटकावत महाविद्यालयाच्या यशात भर घातली. तिला ५० हजारांचे पारितोषिक मिळाले आहे.
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, प्राचार्य डॉ. ए. व्ही. यादव, प्रा. सौ. एस. ए. पाटील, प्रा. एन. डी. चिवटे तसेच महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.



