ब्रिलियंटच्या विद्यार्थ्यांचे एनडीए आणि एसपीआय परीक्षेत यश

कराड/प्रतिनिधी : –
ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कराड या संस्थेने गेल्या ११ वर्षांत अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या विविध राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये सातत्याने उत्कृष्ट निकाल देत शिक्षणाचा उच्च दर्जा सिद्ध केला आहे. या दैदीप्यमान यशपरंपरेत एनडीए आणि एसपीआय परीक्षेतील उज्ज्वल यशाची भर घालत संस्थेने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
ब्रिलियंटचा विद्यार्थी पार्थ विनोद जामदार याने एनडीए परीक्षेत ऑल इंडिया रँक ५७ मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्याची एनडीएमध्ये निवड निश्चित झाली आहे. तसेच संस्थेच्या फाउंडेशन क्लासेसमधील विद्यार्थिनी स्वानंदी प्रकाश गोरड हिने एसपीआय नाशिक प्रवेशासाठी घेतलेल्या लिखित आणि मुलाखत परीक्षेत यश मिळवून प्रवेश मिळवला आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ आयोजित सत्कार समारंभास माजी आमदार आनंदराव पाटील पत्रकार प्रकाश पिसाळ, संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष निसारभाई मुल्ला, सातारा जिल्हा बँकेचे माजी शाखाप्रमुख जयप्रकाश पाटील, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
एनडीए आणि एसपीए प्रवेश मिळवून देणारी सातारा जिल्ह्यातील एकमेव अकॅडमी म्हणून ब्रिलियंट अकॅडमी ओळखली जाते. पालकांनी आपल्या पाल्याच्या एनडीए आणि एसपीए प्रवेशाच्या सक्षम तयारीसाठी ब्रिलियंटची निवड करावी, तसेच इंजिनिअरिंग, मेडिकल, रिसर्च, आर्किटेक्चर व एनडीए, होमी भाभा बालवैज्ञानिक, स्कॉलरशिप बीडीएस क्षेत्रातील हमखास यशासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिलियंट अकॅडमीमध्ये ५ वी ते १२ वी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



