सातारा जिल्हाहोम

कोपर्डे जिल्हा परिषद गटाच्या शाश्वत विकासासाठी साथ द्या – रामकृष्ण वेताळ

करवडीत सौ. विद्या वेताळ, अमित पाटील व सौ. नीलम पिसाळ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

कराड/प्रतिनिधी : –

कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गट विकासाचे आयडॉल बनवण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी साथ द्या. जिल्हा परिषद आणि शासनाच्या विविध योजनांमधून या भागासाठी सर्वाधिक निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन कराड उत्तरचे युवा नेते रामकृष्ण वेताळ यांनी केले.

करवडी, ता. कराड येथे कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. विद्या वेताळ, कोपर्डे पंचायत समिती गणाचे उमेदवार अमित पाटील व वाघेरी गणाच्या उमेदवार सौ. नीलम पिसाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संजय पाटील होते. यावेळी कोयना दुध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, कामथीचे सरपंच सुरेश खंडागळे, जेष्ठ नेते भानुदास पोळ, सोसायटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण, देवानंद चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सभेत बोलताना श्री. वेताळ म्हणाले, या सभेसाठी झालेली प्रचंड गर्दी हीच अनेकांना धडकी भरवणारी आहे. याच गर्दीचे विजयात रूपांतर करून कोपर्डे हवेली गट संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आदर्शवत बनवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.

सभेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी, रामकृष्ण वेताळ यांच्याकडे कोणतेही पद नसताना राबवलेल्या उपक्रमांची आणि मिळवलेल्या निधीची माहिती देत, दिवाळी भेट उपक्रमाची स्तुती केली. स्वाभिमान जपण्यासाठी विद्या वेताळ, अमित पाटील व नीलम पिसाळ यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे. यावेळी जिल्हा परिषद गटाचा उमेदवार सौ. विद्या वेताळ, वाघेरी गणाच्या उमेदवार सौ. नीलम पिसाळ, कोपर्डे हवेली गणाचे उमेदवार अमित पाटील यांनी विकास कामाचे व्हिजन लोकांसमोर मांडले. याचबरोबर शासकीय योजना लोकापर्यंत कशा पोहोचवल्या जातील याचीही माहिती दिली.

या सभेला महिला आणि पुरुषांची प्रचंड मोठी गर्दी झाली होती. या पटांगणावरील सर्वांचे उच्चांक मोडणारी ही सभा आहे, असे या सभेला जमलेले लोक बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पिसाळ यांनी केले. तर आभार उपसरपंच अधिकराव पिसाळ यांनी मानले. या सभेला संजय पिसाळ, मोहन पिसाळ, माजी उपसरपंच दयानंद पवार, माजी सरपंच बाळासो पवार, सोसायटीचे अध्यक्ष सुरेश पाटील, याकुब पटेल, जयसिंग डांगे, चेअरमन विलास जाधव, विलास डुबल, संजय पाटील, अमित डुबल, महेश पिसाळ व करवडी गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री वेताळ यांच्या दिवाळी भेट उपक्रमाचे कौतुक

या सभेसाठी करवडी गावातील आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे लोक रामकृष्ण वेताळ यांनी मतदार संघातील ज्या घरांमध्ये दुःखद घटना घडली आणि त्यांच्या घरी दिवाळी साजरी होणार नाही, अशा दुःखी लोकांसाठी त्यांनी यावर्षी दिवाळी भेट उपक्रम राबवला होता. यामुळे दुःखी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. या श्री. वेताळ यांच्या उपक्रमाचे या सभेसाठी आलेले लोक तोंडभरून कौतुक करत होते आणि आम्ही रामकृष वेताळ भाऊंच्या पाठीशी असल्याचे बोलत होते.

Related Articles