ताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हा

मंद्रुळकोळे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : डॉ. प्राची पाटील

 

ढेबेवाडी  / प्रतिनिधी : –

मंद्रुळकोळे जि प गट व पंचायत समिती गणा तील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या असे प्रतिपादन डॉ. प्राची पाटील यांनी त्यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान केले.

मंद्रुळकोळे खुर्द, मालदन,शेजवळवाडी, भोसगाव, ढेबेवाडी येथे पदयात्रा व गावभेटी दरम्यान या बोलत होत्या. माथाडी नेते कै आण्णासाहेब पाटील यांची मी सून आहे माजी आमदार नरेंद्र पाटील यांची पत्नी तर माजी जी प सदस्य रमेश पाटील यांची मी वहिणी आहे आमच्या कुटुंबाला समाजसेवेची परंपरा आहे तीच परंपरा मी प्राणा फाउंडेशन च्या माध्यमातून पुढे सुरू ठेवली आहे पण लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी समाजकारणाला राजकारणाची जोड मिळावी यासाठी मी ही उमेदवारी स्वीकारली आहे. आज गावापासून ते दिल्लीपर्यंत भाजपा चे सरकार आहे त्यामुळं या विभागाच्या विकासकामांसाठी फंड कमी पडू देणार नाही ही मी आपणास ग्वाही देते. वेळ थोडा आहे, आजपासून आपल्या प्रचाराची खरी जबाबदारी तुमच्यावर आहे माझ्यासोबत पंचायत समितीचे तरुण, तडफदार, धडाडीचा उमेदवार नितीन पाटील यांनाही समाजसेवाचा वारसा आहे तो आम्ही असाच पुढे चालू ठेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

मंद्रुळ कोळे पंचायत समिती गणाचे उमेदवार नितीन पाटील बोलताना म्हणाले की गेली 30 वर्ष ढेबेवाडी विभागात प्रत्येक गावात रस्ता,पाणी, लाईट ची सोय असो की समाजमंदिर, शाळा असो माझे वडील हिंदुराव पाटील यांनी गावागावात घराघरात विकास कामे करून एक आदर्श निर्माण केला आहे मीही तोच वारसा पुढं चालवण्यासाठी ही उमेदवारी स्वीकारली आहे तरी आजवर हिंदुराव पाटील बापूंवर दाखवलेला विश्वास माझ्यावरही दाखवून आम्हा दोन्ही उमेदवारांना भरघोस मते निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आकांश खेडेकर,नगरसेवक रविकांत पाटील, अंकुशराव मोरे, मंदाकिनी पाटील,भारतीताई पाटील, प्रतापराव देसाई, आनंदराव मराठे, शिवाजी शिंदे, जयवंत सुतार, आकाश शिंदे, ओंकार शिंदे आदि ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles