सातारा जिल्हाहोम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उंब्रजला शनिवारी जाहीर सभा

कराड/प्रतिनिधी : – 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

शेंद्रे, नागठाणे, पुसेसावळी, पाल, मसूर, उंब्रज, सैदापूर व वारुंजी या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होत असून, शनिवारी दि. ३१ रोजी दुपारी २ वाजता उंब्रज येथील बाजारतळावर या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेस पालकमंत्री शंभूराज देसाई, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, कराड नगर पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, रणजित भोसले, चंद्रकांत जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सौ. रेश्माताई जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सभेमार्फत शिवसेनेच्या विकासाभिमुख धोरणांचा आणि उमेदवारांच्या भूमिकेचा प्रभावी प्रचार करण्यात येणार असून, जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना सातारा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles