सातारा जिल्हाहोम

विद्या वेताळ, नीलम पिसाळ व अमित पाटील यांच्या गावभेटीचा धडाका; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : – 

कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार सौ. विद्या रामकृष्ण वेताळ तसेच वाघेरी पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार सौ. नीलम पिसाळ व कोपर्डे हवेली पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार अमित पाटील यांच्या गावभेटींना सध्या प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

काल नडशी, शिरवडे, अंतवडी आणि रिसवड या गावांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. या प्रत्येक गावात ग्रामस्थांनी ढोल-ताशे, फुलांच्या हारांनी आणि जल्लोषात त्यांचे स्वागत करत आपला जाहीर पाठिंबा दर्शविला.

अनेक वर्षांपासून पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाने डावलल्याची खंत आजही कार्यकर्ते व नागरिकांच्या मनात आहे. याच पार्श्वभूमीवर सौ. विद्या वेताळ यांनी अपक्ष उमेदवारी स्वीकारली असून, त्यांच्या या ठाम निर्णयाला मतदारांकडून मोठे बळ मिळत आहे. “आपणच आमचे उमेदवार” या भावनेतून आता या गटातील नागरिक स्वतःहून प्रचारात सहभागी होत असून, प्रत्येक गावात उत्स्फूर्त जनसागर उसळताना दिसत आहे.

गावभेटीदरम्यान नागरिकांनी आपली भावना स्पष्ट शब्दांत व्यक्त केली. स्वतःचे निर्णय स्वतः घेणारा, दबावाला न झुकणारा आणि सामान्य माणसाशी नाळ जपणारा उमेदवार जिंकवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करू, अशी ठाम भूमिका अनेक ग्रामस्थांनी मांडली. कराडचा स्वाभिमान, गावाचा आत्मसन्मान आणि स्थानिक नेतृत्वाला न्याय मिळावा, ही भावना लोकांच्या बोलण्यातून ठळकपणे पुढे येत आहे.

या संपूर्ण दौऱ्यात रामकृष्ण वेताळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचाराची योग्य दिशा ठरवत प्रभावी जनसंपर्क साधला. वाढता प्रतिसाद, मोठी गर्दी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग पाहता विरोधकांच्या गोटातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. आगामी काळात हा जनाधार अधिक मजबूत होत जाणार असल्याचे संकेत या गावभेटीतून स्पष्टपणे मिळत आहेत.

गावभेटीतून ठळक मुद्दे :

▪ नडशी, शिरवडे, अंतवडी, रिसवड गावांत उत्स्फूर्त स्वागत

▪ अपक्ष उमेदवारीला वाढता जनसमर्थन

▪ “आपणच आमचे उमेदवार” अशी नागरिकांची भावना

▪ कराडचा स्वाभिमान जपण्याचा निर्धार

▪ विरोधकांच्या गोटात खळबळ

Related Articles