सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्यावर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कराड/प्रतिनिधी : –

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ७७ वा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. भवानीनगर येथील ज्येष्ठ सभासद रघुनाथ मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

दरम्यान जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात कृष्णा कारखान्याचे माजी संचालक जयवंतराव जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कारखाना कार्यस्थळावर संरक्षण विभागाकडून शानदार ध्वजसंचलन करण्यात आले.

यावेळी संचालक धोंडीराम जाधव, बाजीराव निकम, अविनाश खरात, विलास भंडारे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, एम के कापूरकर, सुभाष मोहिते, संपतराव मोहिते, चंद्रकांत मोहिते, विलास मोहिते, प्रल्हाद पवार, शंकर सावंत, बाजीराव मोहिते, सुनील गोडसे, बाबासो पाटील, जालिंदर राजमाने, राजेंद्र कुलकर्णी, रोहित मोहिते, राजेंद्र गुरव यांच्यासह खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, साखर शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती.

Related Articles