आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

कराड नगरपरिषद निवडणूक: प्रभाग २ मधून भाजपकडून भाग्यश्री साळुंखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

कराड / प्रतिनिधी : –

कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक १५ रोजी सौ भाग्यश्री साळुंखे यांनी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहे.

त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या समक्ष आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला. अर्ज दाखल करण्याच्या या हालचालीमुळे कराडमधील राजकीय वातावरणात चांगलीच लक्षवेधी चर्चा सुरू झाली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आयोगाने उमेदवारी अर्जासाठी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ऑनलाईन, तर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यास वेळ दिली आहे.

या निवडणुकीत २ डिसेंबर रोजी मतदान होईल, तर ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू असून कराडमधील निवडणुकीची तापमानपातळी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Related Articles