आयुष्यमान स्पेशलसातारा जिल्हा

प्रभाग ७ मधून सौ. विद्या मोरे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल; कराडच्या राजकारणात खळबळ

कराड / प्रतिनिधी :-

कराड नगरपरिषदेसाठी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया वेग घेत असताना  प्रभाग क्रमांक ७ मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक १६ रोजी सौ.विद्या मोरे यांनी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला.

त्यांनी  कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या समक्ष आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला. अर्ज दाखल करण्याच्या  या हालचालीमुळे कराडमधील राजकीय वातावरणात चांगलीच लक्षवेधी चर्चा सुरू झाली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आयोगाने उमेदवारी अर्जासाठी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ऑनलाईन, तर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यास वेळ दिली आहे.

या निवडणुकीत २ डिसेंबर रोजी मतदान होईल, तर ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू असून कराडमधील निवडणुकीची तापमानपातळी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Related Articles