सातारकरांनो… कोकणात जाताय ! माकडताप वाढतोय जरा जपूनच !

पावसाळ्यात कोकणातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक जातात. पण याच काळात क्यासनूर फॉरेस्ट डिसीज (KFD) ज्याला माकड ताप म्हणतात त्याचा धोका वाढतो. हा गोचीडांमुळे पसरणारा गंभीर आजार आहे.कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा (75%) रत्नागिरी (25%) रायगड (25%) माकड तापासाठी अतिसंवेदनशील आहे.
पावसाळ्यातील दमट हवामान गोचीडांच्या वाढीसाठी पोषक असल्याने त्यांचा प्रादुर्भाव वाढतो. वनक्षेत्रात किंवा डोंगर-दऱ्यांमध्ये फिरताना गोचीड चावण्याचा किंवा आजारी/मृत माकडांच्या संपर्कात येण्याचा धोका असतो. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, रक्तस्राव ही या आजाराची गंभीर लक्षणे आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.
सुरक्षिततेसाठी हे उपाय करा : – स्थानिक आरोग्य सूचनांचे पालन करा, पूर्ण बाह्यांचे कपडे घाला आणि कीटकनाशक स्प्रे वापरा, मृत किंवा आजारी माकडांच्या संपर्कात येऊ नका, जंगलातून परतल्यावर कपडे धुवा आणि शरीराची तपासणी करा, घरात आणि परिसरात स्वच्छता राखा, कोणतीही असामान्य लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, माकड तापावर विशिष्ट औषध नसले तरी लक्षणांवर उपचार उपलब्ध आहेत, आपल्या आरोग्याला प्राधान्य देऊन पावसाळ्यात कोकणात जबाबदारीने आणि सावधगिरीने प्रवास करा. पर्यटक आणि ट्रेकिंग युवक आणि युवतींसाठी माझ्या खास सूचना आहेत.
– डॉ. विश्वनाथ शालन हिरानाथ चव्हाण (कन्सल्टंट फिजिशियनडायबिटीस बीपी थायरॉयड तज्ञ (MBBS MD MEDICINE Dip Echocardiography)
संपर्क : 93597 27135.