सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
प्रेमलाकाकी विद्यालयात शुभचिंतन कार्यक्रम उत्साहात
संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरू करणार - आनंदराव पाटील
29 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
विजयनगर (ता. कराड) येथील प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालयात दहावी बोर्ड परिक्षा मार्च 2025 रोजी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार आनंदराव पाटील (नाना), तर प्रमुख पाहुणे म्हणून मलकापूर रोटरी क्लबचे सलीम मुजावर होते. यावेळी कदम सर, जाधव सर उपस्थित होते.
माजी आमदार आनंदराव पाटील यांनी संस्थेने विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास करण्यासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी काकांनी शिक्षणासाठी केलेल्या विविध सहकार्याची माहिती दिली. तसेच शाळेतील विजयनगर परिसरातील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्यालय उभारल्याचे सांगितले. तसेच संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, तसेच नवीन अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे सांगितले. जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाचा दृढ विश्वास, कष्ट करण्याची तयारी, संस्कार या तीन गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आई- वडील आणि गुरूंनी दिलेले संस्कार आचरणात आणले पाहिजेत. तरच यशाला गवसणी घालता येईल, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
सलीम मुजावर यांनी विद्यार्थ्यांना गुरूचे महत्त्व पटवून दिले. तसेच अभ्यासाबरोबर योगाचेही महत्त्व सांगितले. जीवनात यशस्वी होण्यासाठी गती आणि दिशा दोन्ही महत्वाच्या असल्याचे सांगितले. श्री. जाधव सर यांनी शेतकरी ज्याप्रमाणे शेताची मशागत करतो, आपले पिक फुलवतो; त्याप्रमाणे विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकाला शेतीप्रमाणेच मशागत करावी लागते. त्यानंतर विद्यार्थी हे बहरलेले पीक उद्याचा भारत घडवण्यासाठी तयार होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एम. एन. चव्हाण, सूत्रसंचालन रोहिणी फाळके यांनी केले. विद्यार्थी मनोगत गणेश तांदळे, आयमन पटेल, साक्षी देवकर यांनी केले. सलीम पटेल यांच्यावतीने विध्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले दर्शना माने यांनी आभार मानले.
29 1 minute read