सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
कृष्णा कारखान्यावर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
119 Less than a minute

कराड प्रतिनिधी : –
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ७६ वा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संचालक बाजीराव निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दरम्यान जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात कृष्णा कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कारखाना कार्यस्थळावर संरक्षण विभागाकडून शानदार ध्वजसंचलन करण्यात आले.
यावेळी संचालक धोंडीराम जाधव, शिवाजी पाटील, अविनाश खरात, जनरल मॅनेजर ( टेक्निकल) बालाजी पबसेटवार, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, एम के कापूरकर यांच्यासह खातेप्रमुख,अधिकारी ,कर्मचारी, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
119 Less than a minute



