सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
‘कृष्णा’वर ऊस वाहतूक करणार्या वाहनांना रिल्फेक्टर
27 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ऊस वाहतुक करणार्या वाहनांना रिल्फेक्टर बसविण्यात आले. व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कराड शहर पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, कार्यकारी संचालक महावीर घोडके, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र महाडिक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अभय तावरे, पोलिस हवालदार सचिन गुरव, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भारत गोरड, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शितल घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जगदीश जगताप म्हणाले, अपघात टाळण्यासाठी व आपल्या सुरक्षिततेसाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे.
ऊस वाहतूक करणार्या वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात आले. वाहनांचा वेग ठरवून दिला आहे. अतिवेगाचा वापर करू नये. वाहनचालकांनी व्यसन करू नये, वाहन चालवताना मोठ्याने गाणी लावू नयेत. ओव्हरलोड वाहने चालवू नये या सारख्या गोष्टी टाळून अपघात रोखता येतील. अशा सूचना कराड व इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना दिल्या.
यावेळी ऊस वाहतूक करणार्या वाहनांना मान्यवरांच्या हस्ते रिफ्लेक्टर लावण्यात आले. यावेळी जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, संरक्षण अधिकारी संजय नलवडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
27 1 minute read