सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्यावर आरोग्य तपासणी व उपचार शिबीर संपन्न

कराड/प्रतिनिधी : –
य. मो. कृष्णा सहकारी कारखाना व कृष्णा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड कामगार व माता-बालक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये २१७ जणांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक महावीर घोडके, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, मालखेड विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष सदाशिव भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जगदीश जगताप म्हणाले, चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखाना नेहमीच ऊसतोड मजुरांच्या प्रकृतीची काळजी घेत आला आहे. कोरोनातही ऊसतोड मजुरांची काळजी कृष्णा कारखान्याने घेतली होती. यापुढेही त्यांची काळजी कृष्णा कारखाना घेणार आहे. शिबीराची सुरवात धंन्वतरी व स्व.जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली.
कृष्णा हॉस्पीटल वैद्यकिय पथकामधील डॉ. प्रतीक पाटील, डॉ. राजवर्धन सूर्यवंशी, डॉ. कविशा तिवारी, डॉ. चिरंत नाडीग, डॉ. उतरेश्वर भिंगे, डॉ. आदित्य खाडे, डॉ. मयूर जगताप, डॉ. प्रथमेश कराड, डॉ. हर्षल निंबाळकर, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. हर्षल निकम, सुनील यादव यांच्यासह वैद्यकीय स्टाफ यांचे या शिबीरास सहकार्य लाभले.

Related Articles