सातारा जिल्हाहोम

अथणी – रयत शुगर्सचे ३२०० रूपये प्रति मे.टन ऊस बील बँकेत जमा

मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांची महिती 

कराड/प्रतिनिधी : – 

शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील अथणी शुगर्स (रयत युनिट) या साखर कारखान्याने गळीत हंगाम सन २०२४-२५ मधील दि. १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत गळीत केलेल्या ऊसाचे प्रति मे.टन रू ३२००/- प्रमाणे ऊस बिल संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा केले असल्याची माहीती अथणी शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली.

शेतक-यांनी बँकेशी संपर्क साधावा असे ही आवाहन त्यांनी केले. यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड उदयसिंह पाटील-उंडाळकर, अथनी कंपनीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर व सी.एफ.ओ योगेश पाटील, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सुशांत पाटील व युनिट हेड रविन्द्र देशमुख उपस्थित होते.

अथणी-रयत शुगर्स लि. कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पुर्ण केले असून पुर्ण वाढीव क्षमतेने कारखान्याचे गाळप सुरू आहे. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्प देखील कार्यान्वित झाला आहे. अथणी शुगर्सच्या रयत युनिटने चालू गळीत हंगामात दि. २६.१२.२०२४ अखेर १८७२३० मे.टन ऊस गाळप केले असून सरासरी ११.२८ टक्क्यांनी साखर उतारा राखत २ लाख ८ हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. शेतक-यांचे हित विचारात घेवून चालू गळीत हंगामातील गाळपास आलेल्या संपुर्ण ऊसाचे पेमेंट दर पंधरवडयास एकरक्कमी रू.३२००/- प्र.मे. टन प्रमाणे अदा करणार असल्याची माहीती श्रीनिवास पाटील यांनी दिली.

ऊस पुरवठादार शेतक-यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांनी त्यांचे ऋण व्यक्त केले. याप्रसंगी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles