सातारा जिल्हाहोम

आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिला भाऊंच्या आठवणींना उजाळा

रेठरे बुद्रुक येथे स्व. यशवंतराव मोहिते यांच्या स्मृतींना अभिवादन

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्रातील थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील निवासस्थानी कराड दक्षिण विधानसभेचे नूतन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला.

थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या पहिल्या मंत्रीमंडळात मंत्रीपद भूषविले. इतकेच नव्हे तर त्यांनी दीर्घकाळ कराड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना, महाराष्ट्राच्या राजकारणाला विधायक दिशा देण्याचे काम केले. त्यांच्यानंतर तब्बल ३९ वर्षानंतर रेठरे बुद्रुकला आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या रुपाने विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.

आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी रेठरे बुद्रुक येथे स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या निवासस्थानी भेट दिली. याठिकाणी भाऊंच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करत, त्यांच्या पवित्र स्मृतींना त्यांनी वंदन केले. यावेळी कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी आ.डॉ. भोसले यांचे स्वागत केले. आ. डॉ. भोसले यांनी यावेळी सर्वांशी मनमोकळा संवाद साधत, भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. भाऊंनी कराड मतदारसंघाचे दीर्घकाळ नेतृत्व केले आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत कराड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यरत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी माजी आमदार भगवानराव साळुंखे, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, सुदन मोहिते, सरपंच हणमंत सूर्यवंशी, कृष्णा कारखान्याचे संचालक संजय पाटील यांच्यासह मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोबत : फोटो

Related Articles