सातारा जिल्हाहोम

कराड दक्षिण विधानसभा मतदरसंघासाठी केंद्रनिहाय निवडणूक पथके रवाना 

कराड/प्रतिनिधी : – महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व 342 मतदार केंद्रांवरील नियुक्त कर्मचारी मतदान साहित्यासह आज (मंगळवारी) मतदान केंद्रावर रवाना झाले.
यामध्ये नियोजित केंद्रावर जाण्यासाठी 57 एसटी बस, 1 मिनीबस व 5 जीपची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मतदान कर्मचाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण घेण्यात आले. 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार यांनी बुधवारी प्रत्यक्ष होणाऱ्या मतदानाबद्दल काय दक्षता घ्यावी. तसेच विनाविलंब कामकाज कसे पूर्ण करावे, याची सविस्तर माहिती दिली.
आचारसंहिता सहा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, सहा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप कोळी, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, प्रभारी नायब तहसीलदार युवराज पाटील यांनी साहित्य वाटप सुलभ होण्यासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन केले. यावेळी निवडणूक निरीक्षक गीता ए. यांनी उपस्थित राहून निवडणूक ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पथकातील मतदान कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था नियोजनबद्ध करण्यात आली होती. त्यामुळे पथकाचे तात्काळ एकत्रीकरण  होऊन कोणत्याही गोंधळाशिवाय नियोजित वेळेत प्रशिक्षण व मतदान  साहित्य वितरण वेळेत होऊन कर्मचारी बसकडे रवाना झाले. मतदान कर्मचाऱ्यांनी आणलेल्या वाहनांची पार्किंग व्यवस्था बैल बाजाराच्या आवारात करण्यात आली होती. यावेळी वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन केल्यामुळे कुठेही वाहतुकीची कोंडी झाली नाही.

Related Articles