सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचा आ. पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीर पाठिंबा
88 1 minute read

कराड/प्रतिनिधी : – श्री क्षेत्र देहू येथील तपोभूमीतील या समितीचे संस्थापक तुकोबाभक्त मधुसूदन पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे.
याप्रसंगी त्यांनी आ. चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सत्वशीला चव्हाण (भाभी) यांचा वारकरी शाल, तुळशीचा हार घालून सत्कार केला. तसेच संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने आ. चव्हाण यांना पाठिंब्याचे पत्र दिले.
या पत्रात म्हटले आहे की, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना संतभूमीसाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्यामधील अत्यंत महत्वाचे कार्य म्हणजे श्री क्षेत्र देहू जवळील संत तुकोबारायांची ध्यान साधना तपोभूमी भंडारा भामचंद्र डोंगर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून सन २०११ला शासनाने घोषित केले. व त्यासाठी शासनाच्या सांस्कृतिक, पुरातत्व विभागाद्वारे अधिसूचनाही जारी केली. त्यामुळे या संपूर्ण पवित्र क्षेत्राला आज सुरक्षितता प्रदान झाली आहे.
येथील वारकरी धर्माचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने सदर न्याय्य अधिसूचनांचे कायदेशीर पालन होण्यासाठी त्वरीत अद्यादेश काढावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा व संघर्ष केला. परंतु, आपलेनंतर कोणत्याच सरकारने संवेदनशीलपणे दखल घेतली नाही. त्यामुळे डाऊप्रमाणे पुन्हा वारकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली आहे.
आपणच हे कार्य पूर्ण करू शकाल, याची आम्हाला खात्री आहे. त्यासाठी आपणास मुख्यमंत्री म्हणून पुन:श्च भाग्य लाभावे. राज्यातील तमाम जनता जनार्दन, वारकरी, फडकरी दिंडीच्यावतीने आम्ही आपणास जाहीर पाठिंबा देत आहोत.
88 1 minute read