मनोजदादा प्रयत्नांना खा. उदयनराजे भोसले यांची साथ एक कोटी निधी मंजुर
समाज कल्याण मधून सुद्धा दीड कोटी निधी मंजुर

कराड / प्रतिनिधी : –
कराड उत्तर मधील विकास कामांसाठी सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या स्थानिक विकास निधी मधून एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. कराड उत्तर भारतीय जनता पार्टीने ते माननीय मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून कराड उत्तर मधील १३ गावांमध्ये विकास कामे साकारली जाणार आहेत.
समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून दीड कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. कराड उत्तर मधील १२ गावांमध्ये निधी मंजुर झाला आहे.
मसूर ब्रह्मपुरी येथे सावता माळी मंदिर सभा मंडप बांधणे १० लक्ष, हेळगाव येथे नरसिंह मंदिर सभामंडप बांधणे १० लक्ष, अंधारवाडी येदर अंतर्गत रस्ता काँक्रीकरण करणे ७ लक्ष, शिवडे येथे २ हायमास्ट बसवणे ३ लक्ष, सोनापूर येथे बागलवस्ती येथे सभा मंडप बांधणे १० लक्ष,शिवडे येथे हिराई गार्डन मध्ये अंतर्गत रस्ता काँक्रीकरण करणे ७ लक्ष, कामठी येथे रामोशी वस्ती सभा मंडप बांधणे १० लक्ष, टेंभू येथे अंतर्गत काँक्रीकरण करणे ७ लक्ष, जायगाव येथे उर्वरित सभामुखाचे काम करणे ५ लक्ष, चोरगेवाडी तेथे सभा मंडप बांधणे ५ लक्ष , कन्हेरखेड काटेवाडी तेथे सभा मंडप बांधणे १२ लक्ष कोपर्डे येथे सभा मंडप बांधणे १० लक्ष, चोरडे येथील ज्योतिर्लिंग मध्ये सभा मंडप बांधणे १० लक्ष. इत्यादी कामांचा समावेश आहे.