आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

कराड उत्तरेतून मनोजदादांना आमदार करणारच

मनोजबंध कार्यक्रमात महिलांचा नारा

 

कराड / प्रतिनिधी : –

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मनोजदादा घोरपडे या नेतृत्वाने महिलांना चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर काढून जगण्याची नवी दिशा दिली आहे. महिलांचे विविध प्रश्न सोडवून त्यांचे स्वावलंबन करण्यासाठी मनोजदादा अहोरात्र धडपडत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडनुकीत आम्ही मनोजदादांनाच आमदार करणार, असा नारा उंब्रज येथील मनोजबंध कार्यक्रमात हजारो महिलांनी दिला.

कराड उतरचे नेते मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी महिला सखी मंचच्या वतीने उंब्रज (ता. कराड) येथे मनोजबंध कार्यक्रमास पाच हजारांवर महिलांनी हजेरी लावून आनंद घेतला. प्रसिद्ध निवेदक दीपक साबळे प्रस्तुत खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

महाराष्ट्रातील डान्सर कवीन घनिष्ठा काटकर व तेजल शिंदे यांच्या अदाकारीने कार्यक्रमात रंगत आणती उंब्रज व पाल जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील महिला, माता भगिनी मीठ्या संख्येने या उपस्थित होत्या. यावेळी प्रशासकीय सेवेत नियुक्ती झालेल्या कर्तृत्ववान महिलांचा मनोजदादा घोरपडे याच्या हस्ते साकार करण्यात आला. तेजस्विनी घोरपडे म्हणाल्या, स्वाभिमानी महिला सखी मंच वतीने महिलांना देणारे विविध अडचणी त्यांच्या मनतील प्रश्न सोडवण्यासाठी मनोजदादांच्या नेतृत्वाखाली सातत्याने काम सुरू आहे राज्य शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना तसेच स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विविध उपक्रम रयतेपर्यंत जातात. शिलाई मशिन, आटा चक्की, वॉटर प्युरिफायर तसेच शेतकयांना फवारणी पंप वित्तरण सुरु आहे. मतदारसंघाल मोतीबिंदू शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया, आरोग्य शिबिरे व उपचार तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत महिलांनी मनोजदादांना आमदार करायचे, असे आवाहन केले.

यावेळी मंगलताई घोरपडे, समताताई घोरपडे, अंजलीताई जाधव, मीनाताई जाधव, उप सरपंच सुनंदाताई जाधव, निशा भीसे पाटील, शोमा खडंग, शोभा जाधर, पूनम शेजवळ, मनिषा नलावडे पल्लवी पवार, उज्वला बाबर, अनुराधा यादव, विमल सुपनेकर, शालिनीताई मोहिते, कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष मीनाक्षी पोळ, उपाध्यक्ष वैशाली भांडरे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles